रत्नागिरी जिल्ह्यातील ११ हजार ५२९ होर्डिंग्ज हटविली

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक, आदी हटविण्यात आले आहेत. आतापर्यंत ११ हजार ५२९ बॅनर्स हटविण्यात आले आहेत. जिल्हा निवडणू‌क निर्णय अधिकारी यांनी ही माहिती दिली.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भागात लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स हटविण्याचे आदेश देण्यात आले. अनेक लोकप्रतिनिधी, त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षासह आपली वैयक्तीक प्रसिद्धी आणि प्रचारासाठी होर्डिंग्ज लावले आहेत. तसेच शासनाने विविध संस्थांमार्फत आपल्या योजनांचे बॅनर लावले होते. निवडणुकीत हे बॅनर प्रसिद्धी आणि प्रचाराचा भाग ठरू शकतात. असे सर्व बॅनर्स पोस्टर्स, होर्डिंग्ज फलक आणि झेंडे काढण्यास सांगितले होते. त्याची अंमलबावणी करण्यात आली आहे जिल्ह्यात सुमारे अडीच हजारांच्या बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, काटाऊट फलक काढण्यात आले. यामध्ये ५ हजार ९०० पोस्टर्स, १ हजार ७९८ भित्तीपत्र, ४२७ कटाऊट, ४४७ बॅनर्स, १ हजार २०५ झेंडे आदीचा यामध्ये समावेश आहे. आजपर्यत निवडणूक विभागाने त्यांना मुदत दिली होती. त्यानुसार याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 21/Oct/2024