Breaking: राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर!; रत्नागिरीत अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित

मुंबई : महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या घोषणेनुसार, रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलं आहे.

राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

गडचिरोली: सर्वसाधारण (महिला)

ठाणे: सर्वसाधारण (महिला)

पालघर: अनुसूचित जमाती

रायगड: सर्वसाधारण

रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग: सर्वसाधारण

नाशिक: सर्वसाधारण

धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदूरबार: अनुसूचित जमाती

जळगाव: सर्वसाधारण

अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला)

पुणे: सर्वसाधारण

सातारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली: सर्वसाधारण (महिला)

सोलापूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर: सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण

जालना: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड: अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली: अनुसूचित जाती

नांदेड: नागरिकांचा मागास प्रवर्ग

धाराशिव: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर: सर्वसाधारण (महिला)

अमरावती: सर्वसाधारण (महिला)

अकोला: अनुसूचित जमाती (महिला)

परभणी: अनुसूचित जाती

वाशिम: अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा: सर्वसाधारण

यवतमाळ: सर्वसाधारण

नागपूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा: अनुसूचित जाती

भंडारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया: सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर: अनुसूचित जाती (महिला)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 12-09-2025