Rajapur : आजाराला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : मुर (ता. राजापूर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जनार्दन नारायण पाथरे (६०, रा. मुर, ता. राजापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन पाथरे यांनी आजाराला कंटाळून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.

मंगळवारी (ता. ९) त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 13/Sep/2025