Firing outside Disha Patani House: अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार!

Firing outside Disha Patani House: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.
या घरात सध्या दिशा पटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पटनी राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला.

तसेच संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली.

काही महिन्यांपूर्वी दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनीने एक व्हिडिओ बनवला होता. त्यावरून दावा करण्यात आला की तिने प्रेमानंदजी महाराज यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे.

सदर प्रकरणावर खुशबूने लगेचच स्पष्टीकरण देत सांगितले की, तिचा व्हिडिओ प्रेमानंदजींसाठी नसून अनिरुद्धाचार्य यांच्यासाठी होता.

खरंतर अनिरुद्धाचार्य यांनी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्यामुळे खुशबू संतप्त झाली आणि अनिरुद्धाचार्य यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 13-09-2025