दापोली : क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रो-कबड्डी पंच आशुतोष साळुंखे यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिशा महाराष्ट्राची यांच्यावतीने १४ रोजी नवी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन कार्यक्रमावेळी वितरित करण्यात येणार आहे.
भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे (AKFI) राष्ट्रीय कबड्डी पंच, राज्य खो-खो पंच तसेच डॉजबॉल राज्य पंच म्हणून कार्यरत असलेल्या आशुतोष साळुंखे यांनी कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, बास्केटबॉल, कॅरम, पोहणे, क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये रस ठेवला असून, एनसीसीचे सर्टिफिकेट तसेच इंटरनॅशनल एनसीसी सर्टिफिकेटही मिळवले आहे. साळुंखे यांनी महाकबड्डी सीझन-२ पंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. विज्ञान व गणित विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 13/Sep/2025












