Khed : चोरीच्या वाळूचा साठा करून ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हा

खेड : तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर व धामणदेवी जेटीवरील दोन प्लॉटवर चोरीच्या वाळूची अनधिकृतपणे वाहतूक करून जेटीलगतच साठा करून ठेवणाऱ्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी करण्यात आली आहे.

जिहान शब्बीर काझी (रा. धामणदेवी, ता. खेड) व रवी मालकू चव्हाण (रा. फरशी तिठा, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मंडळ अधिकारी योगेश बना यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार, या दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 13/Sep/2025