रत्नागिरी : कोकण रेल्वेच्यावतीने रेल्वे विविध विभागात काम करताना महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ३४ व्या वार्षिक स्थापना दिवशी सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये यावर्षीचा डायरेक्टर लेव्हल (फायनान्स) वैयक्तिक पातळी अवॉर्ड – २०२४ आणि सांघिक प्रकारातील सी. एम. डी. लेव्हल ग्रुप अवॉर्ड विकास विश्वनाथ पेजे यांना प्रदान करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांच्या मडगाव येथे झालेल्या पुरस्कार पेजे यांना देण्यात आला. कोकण रेल्वेचे राजेश बडंग, रामकृष्ण हेगडे हे त्यावेळी उपस्थित होते. कोकण रेल्वेत मागील अनेक वर्षे सेवा बजावताना विकास पेजे यांनी रेल्वेच्या विविध विभागात काम केले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या उद्दिष्टानुरूप व अपेक्षानुरूप काम करून सर्वांची मने जिंकली. अनेकवेळा सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी बाजू मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पेजे हे रत्नागिरी तालुक्यातील नाचणे या गावचे आहेत. ओबीसी जनजागृती, कर्मचारी प्रबोधन, शैक्षणिक मार्गदर्शन, सामाजिक कार्याचा प्रसार, समाज संघटन, महिला सक्षमीकरण, आरोग्य, कामगार कल्याण अशा अनेक स्वरूपात त्यांनी कार्य केली आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन कोकण रेल्वेने त्यांना पुरस्कार प्रदान केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 21-10-2024









