Chiplun : डेरवण क्रीडा संकुलात जिल्हास्तर डॉजबॉल स्पर्धा

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने एस.व्ही.जे.सी.टी. क्रीडा संकुल डेरवण यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा नुकत्याच डेरवण एस.व्ही.जे.सी.टी. क्रीडा संकुलामध्ये पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुले, मुली व १९ वर्षाखालील मुले, मुली अशा एकूण २४ संघानी सहभाग नोंदवला. रत्नागिरी जिल्ह्यातून विविध शाळांतून हे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी डेरवण क्रीडा संकुलचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनील कोळी, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष उदयराज कळंबे, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, माजी सभापती ऋतुजा जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन अॅथलेटिक्स राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू क्रांती म्हस्कर हिच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी तांत्रिक कमिटी प्रमुख, राष्ट्रीय खेळाडू व पंच प्रथमेश रसाळ आणि सर्व पंचांनी मेहनत घेतली.

१७ वर्षे वयोगटामध्ये मुलांच्या विभागात प्रथम क्रमांक दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, द्वितीय पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी आणि तृतीय क्रमांक सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी यांनी पटकावला.

१७ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या विभागात अनुक्रमे दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी आणि पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, १९ वर्षे वयोगटामध्ये मुलांच्या विभागात अनुक्रमे पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, माखजन इंग्लिश स्कूल माखजन व माध्यमिक विद्यालय वरवडे, १९ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या विभागात -अनुक्रमे पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, माखजन इंग्लिश स्कूल माखजन व माध्यमिक विद्यालय वरवडे या शाळांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ भिंगे, अमृत कडगावे, विनायक पवार, अविनाश पवार आणि क्रीडा संकुलातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 13/Sep/2025