मंडणगड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडणगड पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता दापोली फाटा व तालुक्यातील अन्य चेक नाक्यांवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
आचारसंहिता असल्याने दापोली विधानसभा मतदार संघातील मंडणगड तालुक्यात मंडणगड पोलीस ठाण्यातील भरारी पथकामधील (FST) अधिकारी, कर्मचारी सतर्क असून आचारसंहितेच्या काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, अवैधरीत्या मद्याची वाहतूक होऊ नये याचबरोबर अवैधरीत्या रोकड बाळगणे यावर अंकुश म्हणून भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करत आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी या भरारी पथकाने दापोली मंडणगड फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 21/Oct/2024














