Accident : गणपतीपुळे रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दोघे जखमी

रत्नागिरी : मुंबईहून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुण-तरुणीचा गणपतीपुळे रस्त्यावरील एका हॉटेलसमोर दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश सुरेंद्र शिर्के (वय २७) व संध्या अर्जुन आखाडे (वय २७, रा. मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेल समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुण-तरुणी हे देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. गणपतीपुळे रस्त्यावर त्यांची दुचाकीस्लीप होऊन अपघात झाला. यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 13/Sep/2025