खेड : कोष्टीआळी येथे गावठी हातभट्टी दारु जप्त

खेड : शहरातील कोष्टी आळी येथील मोकळ्या जागेत असलेल्या एका गावठी हातभट्टी दारुधंदयावर धाड टाकून ३ हजार, ५०० रुपये किंमतीची ३५ लीटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. हि कारवाई. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३:४० वाजता करण्यात आली असून खेड पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस शिपाई शबाना अस्लम मुल्ला यांनी फिर्याद दिल्यानुसार आरोपी प्रकाश हरिचंद्र जाधव (वय-५० वर्षे, रा. भरणे काळकाई मंदीरा शेजारील पवार यांची चाळ, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 21/Oct/2024