खेड : एलपीजी गॅस ग्राहकांना नियमित सिलिंडर रिफील तसेच अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा व्हावी यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे असल्याचे संचालक अमोल बुटाला यांनी कळवले आहे.
खेड तालुक्यासह परिसरातील अनेक ग्राहकांनी खेड येथील एचपी बुटाला, गॅस जोडणी घेतली आहे असे असले तरी सध्या ते ग्राहक मुंबई, पुणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत अशा सर्व ग्राहकांनीही आवश्यक कागदपत्रांसह गॅस कार्यालयात येऊन ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी न झाल्यास ग्राहकांना सिलिंडर रिफिल मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच अनुदानाची रक्कम वेळेवर बँक खात्यात जमा होण्यात विलंब किंवा अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी ग्राहकांनी आपले गॅस ग्राहक कार्ड आणि आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सोयीसाठी गॅस डिलरकडून आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 15/Sep/2025














