संगमेश्वर : विषारी द्रव प्यायलेल्या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील माभळे काष्टेवाडी येथे घडली. ओवी ओंकार जाधव (वय २९) असे विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत ओंकार शंकर जाधव याने पोलिसांना माहिती दिली आहे.
ओवी यांनी ५ सप्टेंबरला चुकून विषारी द्रव प्यायल्याने त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचार करण्यासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 15/Sep/2025














