पुणे : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जीआर ओबीसींवर गदा आणणारा नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे, बिना नोंदींचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही.
त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजांतील नेते खरी वास्तविकता काय आहे? हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत दोन्ही समाजांतील तेढ कमी होणार नाही. मी सांगतो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल, कुणबी नोंद नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 15-09-2025














