Ratnagiri : कसोप-कुणबीवाडी येथील वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : शहराजवळील कसोप-कुणबीवाडी येथील वृद्ध महिलेच्या अचानक छातीत दुखू लागले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रणिता रामचंद्र राज्ये (वय ७०, रा. कुणबीवाडी-कसोप, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. मृत प्रणिता राड्ये यांना हृदयाला ब्लॉकेज होते. तिच्यावर पूर्वी उपचार सुरू होते. शुक्रवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 15/Sep/2025