संगमेश्वर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून संगमेश्वर नाक्यामध्ये विविध वाहनांची तपासणी करताना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील नाका महत्त्वाचा असून कोल्हापूर तसेच या महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी थांबतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून संगमेश्वर पोलिसांनी काळजी घेण्यास सुरुवात केली असून वाहनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलिस संगमेश्वर नाक्यामध्ये नाकाबंदी करत ही तपासणी करताना दिसत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 21/Oct/2024














