रत्नागिरी : कोकण रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गणेश सुर्वे यांना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांच्या हस्ते खास पुरस्कार देण्यात आला.
कोकण रेल्वेच्या विविध विभागांमध्ये लक्षणीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा कोकण रेल्वेच्या स्थापना दिनानिमित्त गौरव सोहळा मडगांव येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. त्यामध्ये सुर्वे यांचा समावेश होता. महामंडळाचे संचालक राजेश भडंग आणि आर. के . हेगडे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 21/Oct/2024









