Advocate General Birendra Saraf Resigns: राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा

मुंबई : मराठा समाजाला ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याच्या निर्णयात कायदेशीर सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

तथापि, राज्य सरकारकडून पुढील व्यवस्था होईपर्यंत सराफ यांना काम पाहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी जानेवारीपर्यंत काम पाहण्याचे मान्य केले आहे.

सराफ हे २०२२ पासून महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने त्यांची यापदी नियुक्ती केली होती. २०२४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतरही ते या पदावर कायम होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 17-09-2025