रत्नागिरी : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील साडेपाच लाखांहून अधिक गर्भवती महिलांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक महिलांनी मातृवंदनेचा लाभ घेतला आहे. सरकारच्या वतीने या योजनेची जनजागृती १५ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. त्यामुळे त्याला आणखीन चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकंदरीत मातृवंदना ही योजना रत्नागिरी जिल्ह्यातील गर्भवती महिलांची आधार बनत चालली आहे.
गरोदर मातांची नियमित तपासणी व्हावी, त्यांना सकस पोषण आहार वेळेत उपलब्ध व्हावेत गरोदरपणात व बाळंतपणात महिलांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने केंद्र शासनामार्फत शहर व ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिदृष्ट्या वंचित घटकातील महिलांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही १ जानेवारी २०१७ रोजी सुरूवात झाली.
सुरूवातीला केवळ पहिल्या मुलासाठी लाभ देत होते. त्यानंतर १ एप्रील २०२२ पासून ते आता दुसऱ्या मुलासाठी लाभ देत आहेत. जर ती मुलगी असेल तर योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना पहिल्या मुलासाठी ५ हजार रूपये मातृत्व लाभ दोन हप्त्यांत प्रदान केला जातो, दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर ६ हजार रूपयांची मदत केली जाते.
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील गर्भवती महिला मोठ्या संख्येने घेत आहेत. दरम्यान, नुकतेच जिल्ह्यासह राज्यभरात पंतप्रधान मातृवंदना या योजनेची जनजागृती करण्यात आली. घरोघरी जावून नावनोंदणी करण्यात आली तसेच अंगणवाडी, आशावर्कर यांच्या माध्यमातून या योजनेची माहिती ही देण्यात आली. १५ ऑगस्टपर्यंत ही योजना राबवण्यात आली यामुळे योजनेची संख्या जिल्ह्यासह राज्यात वाढण्याची शक्यता आहे.
गर्भवतींसाठी फायदे
शुगर, बीपी, हिमोग्लोवीन, वजन यासह इतर तपासण्या केल्या जातात. गर्भ ३ ते ६ महिन्याचा झाल्यानंतर सरकारी किंवा खासगी दवाखान्यात वेळेवर संपर्क साधू शकतात. यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांनी मातृवंदना योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 17/Sep/2025














