चिपळूण : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक व अनेक वर्षे शिक्षक संघटनेचे नेतृत्व करणारे बळीराम मोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
येथील उद्योजक प्रशांत यादव यांच्याबरोबर बळीराम मोरे यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत सक्रिय काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची भाजपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नेते प्रशांत यादव, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, खा. नारायण राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 17/Sep/2025














