चिपळूण : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ‘जीआयटी क्वांटआयक्यू हब’ या नव्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व अध्ययनाचे साधनसंपन्न व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून हे केंद्र सुरू केले आहे.
घरडा महाविद्यालयाच्या या केंद्रामध्ये फाउंडेशन, इंटरमिजिएट व अॅडव्हान्स अशा तीन स्तरांवर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे अभ्यासक्रम विविध शासकीय सेवा परीक्षा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्क्रिनिंग टेस्ट तसेच विभागीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना भक्कम पायाभूत तयारी घडवून आणतील. यातून कोकणातील विद्याथ्यर्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 17/Sep/2025














