रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेल्या उक्षी रस्त्यावर शीळफाटा येथे अवजड वाहनाला झालेल्या अपघातामुळे सोमवारी (ता. १५) रात्रीपासून वाहतूक ठप्प होती. अपघातग्रस्त ट्रक मंगळवारी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
रत्नागिरीतून उक्षीमार्गे पुढे जाणारा एक अवजड ट्रक सोमवारी (ता. १५) रात्री शीळफाटा येथे उलटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तिथे एकेरी वाहतूक सुरू केली होती. आज दुपारी क्रेनच्या साह्याने अवजड ट्रक बाजूला काढण्यात आला. या मार्गावरून अवजड वाहने नेऊ नयेत, असे फलक असतानाही हा ट्रक येथून आलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी येथील वाहनचालकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 18/Sep/2025













