रत्नागिरी : तालुका क्रीडा संकुल, दापोली येथील अंतर्गत व्यायामशाळा साहित्य दापोली तालुक्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात विनामूल्य वापरास द्यावयाचे आहे.
स्टॅम्प पेपरवर करार करून द्यावा लागेल. अटी व शर्ती मान्य असणाऱ्या दापोली तालुक्यातील इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती यांनी आपल्या अधिकृत मेलद्वारा ratnagiridsogmail.com या ई मेलवर २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी एस. एस. धारूरकर यांनी केले आहे.
सदर व्यायामशाळा साहित्य ठेवण्यास किमान ५०० चौ. फू. बंदिस्त हॉल, व्यायामशाळा खोली स्वतःच्या मालकीची असणे अनिवार्य आहे. व्यायामशाळा साहित्य मागणी केल्यास ते विनाविलंब तालुका क्रीडा संकुल येथे सुस्थितीत पोच करावे लागेल. व्यायामशाळा साहित्य परस्पर इतर कोणालाही हस्तांतरीत करावयाचे नाही किंवा त्याचा व्यावसायिक वापर करावयाचा नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 18/Sep/2025












