श्री भैरीला घातलेल्या गाऱ्हाण्यात बाळ मानेंचे मनसुबे दिसून आले | Ratnagiri vidhansabha 2024

श्री भैरीला घातलेल्या गाऱ्हाण्यात बाळ मानेंचे मनसुबे दिसून आले | Ratnagiri vidhansabha 2024

रत्नागिरी करांना बदल हवाय…तमाम जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन मी माझी भूमिका ठरवीन अशी भूमिका आज सकाळी माजी आमदार बाळ माने यांनी मांडली होती. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या शर्टावर कमळ चिन्ह लाउनच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या कार्यपद्धती विषयी नाराजी व्यक्त केली होती. सायंकाळी ५ वाजता श्री भैरी मंदिरात बाळ माने आपल्या समर्थकांसह गोळा झाले आणि त्यांनी भैरी ला साकडे घातले. यावेळी देखील त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. बाळ माने यांचे मनसुबे आता स्पष्ट दिसू लागले असून श्री भैरी देवाला घातलेल्या गाऱ्हाण्यात त्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतोय.