Shardiya Navaratri utsav 2025 : रत्नागिरी जिल्ह्यात दुर्गामातेच्या ५०१ मूर्तींची होणार प्रतिष्ठापना

रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरू होत आहे. तरुणाईलाही गरबा दांडियाचे वेध लागले असून, यावर्षी सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. या दिवशी जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी मिळून एकूण ५०१ दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, तर सार्वजनिक आणि खासगी मिळून एकूण १९ हजार ७३९ प्रतिमा आणि घटपूजन करण्यात येणार आहे.

या नऊ दिवसांत जिल्ह्यात दांडिया व गरब्याची ‘धूम’ अनुभवायला मिळणार असून, यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत हा उत्सव मर्यादित होता.

मात्र, यामध्ये आता कमालीचा बदल झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील पोलिस ठाणे निहाय आकडेवारीनुसार, दाभोळ पोलिस ठाणे हद्दीत दुर्गामातेच्या सार्वजनिक २ खासगी ४, मंडणगड सार्वजनिक ४३ खासगी ३, खेड सार्वजनिक २७खासगी ०, दापोली सार्वजनिक ३३ खासगी १७, बाणकोट सार्वजनिक १२ खासगी ४, जयगड सार्वजनिक १८ खासगी ४, पूर्णगड सार्वजनिक २० खासगी ०, संगमेश्वर सार्वजनिक १७ खासगी ६, रत्नागिरी शहर सार्वजनिक ६० खासगी १, रत्नागिरी ग्रामीण सार्वजनिक ९० खासगी १३, राजापूर सार्वजनिक १२ खासगी ०, देवरुख सार्वजनिक २४ खासगी ५, नाटे सार्वजनिक ९ खासगी २, लांजा सार्वजनिक १४ खासगी २, अलोरे सार्वजनिक १२ खासगी ०, सावर्डे सार्वजनिक ३ खासगी १, चिपळूण सार्वजनिक १४ खासगी १, गुहागर सार्वजनिक २६ खासगी २ अशा एकूण ४३६ सार्वजनिक तर ६५ खाासगी मिळून जिल्ह्यात ५०१ दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 20/Sep/2025