Rajapur : पांगरे बुद्रुक येथे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती कार्यक्रम

राजापूर : तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात १७ सप्टेंबर रोजी “महिलांची सुरक्षा” आणि “पीडित भरपाई योजना” या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रमुख सचिव आर. आर. पाटील, बाल संरक्षण अधिकारी प्रदीप मांडवकर, राजापूरचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव प्रमुख तसेच अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका तसेच पांगरे बुद्रुक गावातील नागरिक उपस्थित होते.

सचिव आर. आर. पाटील यांनी या प्रसंगी पीडित भरपाई योजना तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 18/Sep/2025