Ratnagiri: मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांना सर्वोत्कृष्ट संशोधन निधी आणि नावीन्य पुरस्कार प्राप्त

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ साठीचे संशोधन, आदर्श शिक्षक, तसेच अन्य पुरस्कार यांचे वितरण केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य व संसदीय कार्य मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमाणपत्र व रोखरक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात संशोधन प्रकल्प अनुदान मिळवणाऱ्या मान्यवरांमध्ये रत्नागिरी उपपरीसर येथील पर्यावरणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग यशवंत पाटील यांना पुरस्काराद्वारे गौरविण्यात आले.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पांडुरंग पाटील पर्यावरणशास्त्र विभागाचे, रत्नागिरी उपपरीसार येथे एमएस्सी पर्यावरणशास्त्र विषयासाठी सहयोगी प्राध्यापक व PhD मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पूर्ण केली आहे आणि देश-विदेशात काम करत आहेत. हवा प्रदूषण विषय व क्षेत्रामध्ये त्यांना NAAQM अंतर्गत प्रकल्प प्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. सदर पुरस्कार हा संशोधन विषयक अनुदान मिळवण्याच्या शिक्षकांमधून डॉ. पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना त्यांचे संशोधन सहाय्यक, विद्यार्थी, तसेच विद्यापीठ व महाविद्यालयांमधील अनेकांचे सहकार्य मिळाले.

डॉ. किशोर सुखटणकर, संचालक उपपरीसार व श्री. अभिनंदन बोरगावे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 19-09-2025