राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत राजापूर तालुक्यातील प्रभाग रचनेतील नोंदविण्यात आलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्यानंतर आता तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि त्याअंतर्गत वारा पंचायत समिती गण हे निश्चित झाले आहेत.
यापूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत तालुक्यात एक जि.प. गट व त्याअंतर्गत दोन पंचायत समिती गण यांची वाढ होऊन एकूण सात जिल्हा परिषाद गट आणि चौदा पंचायत समिती गण यांची निर्मिती झाली होती. मात्र त्यानंतरच्या कालखंडात अनेक घडामोडी घडल्या आणि जुन्याच प्रभागानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या काही गणांची नावे बदलण्यात आली. केवळ ताम्हाणे, केळवली, साखरीनाटे आणि अणसुरे हेच पंचायत समितीचे गण पहिल्याच नावाने कायम ठेवण्यात आले, तर उर्वरित आठ गण नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत.
तालुक्यातील बारा पंचायत समितीचे गण आणि त्या अंतर्गत समाविष्ट गावे १) वडदहसोळ गण (गावे ओणी, मंदरूळ, चुनाकोळवण, कळसवली, वडवली कोंडीवळे, खरवते, वडदहसोळ, शिवणे बुद्रुक), २) रायपाटण गण (गावे-ओझर, सौंदळ, कोळवण खडी, येळवण, ओशिवळे, वाटुळ, आडवली, रायपाटण, परटवली), ३) तळवडेगण (गावे पाचल, कारवली, येरडव, करक, पांगरीखुर्द, झर्ये, तळवडे, परुळे, हरळ), ४) ताम्हाणे गण (गावे ताम्हाणे, अजिवली, हातदे, मूर कोळंब, काजिर्डा, मिळंद, जवळेथर, तुळसवडे), ५) केळवली गण (गावे-केळवली, मोरोशी, तळगाव, ससाळे, हसोळ तर्फे सौन्दळ, मोसम, पांगरी बुद्रूक, दोनीवडे, आंगले, फुफेरे), ६) जुवाटी गण (गावे कोंड्येतर्फे सौंदळ, प्रिंदावन, जुवाटी डोंगर, विल्ये, महाळुंगे, पन्हळे तर्फे सौंदळ, वालये, शेजवली, हातिवले, कणेरी उन्हाळे), ७) धोपेश्वर गण ( गावे कोदवली, शेढे, कोंढे तर्फे राजापूर, शीळ, चिखलगाव, गोठणे दोनीवडे, धोपेश्वर, गोवळ), ८) पेंडखले गण (गावे-भालावली, भू, तेरवण, कोतापूर खिणगिणी, दसूर, देवीहसोळ, पेंडखले), ९) नाटे गण (गावे कशेळी, कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ, मोगरे, नाटे, आंबोळगड), १०) साखरीनाटे (साखरीनाटे, देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, शिवणेखुर्द, सोलगाव), ११) अणसुरे गण (गावे अणुसरे, दळे, कुवेशी, पडवे, जैतापूर, मीठगवाणे, माडबन, साखर, निवेली जुवे जैतापूर), १२) कातळी, गण (गावे सागवे, नाणार, कुंभवडे, तारळ, उपळे).
नवीन पंचायत समिती गण
१) वडदहसोळ २) रायपाटण ३) तळवडे ४) ताम्हाणे ५) केळवली ६) जुवाटी ७) धोपेश्वर ८) पेंडखले ९) नाटे १०) साखरीनाटे ११) अणसुरे १२) कातळी.
नवीन जिल्हा परिषदगट
१) वडदहसोळ, २) तळवडे, ३) जुवाटी ४) धोपेश्वर ५) साखरी नाटे ६) कातळी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 19/Sep/2025












