Ratnagiri : जलतरण तलावाजवळील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील जलतरण तलावा लगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १७ सप्टेंबर रोजी सायं. ४ ते ४.१५ वा. कालावधीत करण्यात आली.

अनिल फौजदार गुप्ता (२८, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. नाचणे, रत्नागिरी) आणि बिपअल शंकर हलदार (२८, मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 19/Sep/2025