राजापूर : तालुक्यामध्ये ओबीसी संघटन अधिक मजबूत करणे आणि सध्या सुरू असलेले ओबीसी आरक्षण अधिक तीव्र करणे या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. ओबीसी बांधवांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष महेश शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात सभा होणार आहे. सभेला तालुका कार्यकारिणी सदस्यांसह जिल्हा प्रतिनिधी, ओबीसी समाज मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 19/Sep/2025












