दापोली : कोल्हापूर-ने दापोली मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसला गुरुवारी (ता. १८) दुपारी कुंभार्ली घाटमाथा ओलांडल्यानंतर मोठा अपघात होण्याचा प्रसंग आला होता. बस अचानक बाजूच्या संरक्षक कड्यावर आदळली. काही क्षणातच ती खोल दरीत कोसळण्याच्या स्थितीत होती. चालकाच्या तत्परतेमुळे बस योग्य वेळी थांबवण्यात आली आणि भीषण दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार ही बस कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता सुटली होती. बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. त्यातून ५० प्रवासी प्रवास करत होते. प्रत्यक्षदर्शी मंदार वझे यांनी सांगितले, हा प्रसंग आंबेनळी घाटातील धोकादायक वळणांची आठवण करून देणारा होता. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवासी काही काळ भयभीत झाले होते, मात्र नशिबाने सर्वजण सुखरूप बचावले. एसटीची गाडी त्याठिकाणी आली आणि वाहकाच्या बाजूने घसरली होती. सुदैवाने याठिकाणी एक मोठा कठडा होता. एसटीच्या धक्क्याने तो कठडा कोसळला. गाडी त्या कठड्यावर अडली. तेथे कठडा नसता तर भीषण अपघात घडण्याची शक्यता होती. वारंवार असे प्रसंग घडत असल्याने महामंडळाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 19/Sep/2025












