दापोली : तालुक्यातील दाभोळजवळील पणदेरी (बौद्धवाडी) येथे नितीन शंकर कांबळे (वय ३९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ सप्टेंबरला दुपारी घडली. कांबळे हे काही काळापासून मानसिक अस्वस्थतेने त्रस्त होते.
१७ सप्टेंबरला दुपारी त्यांनी घरातील खोलीतील लाकडी भाल्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ दाभोळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला. आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. याचा तपास दाभोळ पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 19/Sep/2025












