लांजा : तालुक्यातील कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी घनकचरा प्रकल्पाविरोधात गेल्या ३६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही, ही खेदाची बाब आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी लांजा तालुक्यातील कोत्रेवाडीतील उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून कोत्रेवाडीतील घनकचरा प्रकल्पाविरोधातील ग्रामस्थांचे सुरू असलेल्या उपोषणाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे. राजकारण काही प्रशासनाकडून असो दखल घेतलीच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
जर दोन दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. तर मी तुमच्या सोबत आहे. मी स्वतः उद्धवसेना स्टाईलने रास्ता रोको करू आणि हा प्रश्न धसास लावू, असे आश्वासन कागदोपत्री दिले. पुरावे ग्रामस्थांकडे असताना घनकचरा प्रकल्प विरोधातील उपोषणकर्ते यांना निर्णय देण्यास प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही का झाली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 19/Sep/2025












