रत्नागिरी : विधानसभा निवडणूक २०२४- उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ

रत्नागिरी : विधानसभेचा बिगुल वाजला असून, मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मविआ किंवा महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी कोणत्या राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्याचा मुहूर्त साधणार, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे. राज्याची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून, २३ रोजी मतमोजणी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 22-10-2024