चिपळूण (प्रतिनिधी) : रासायनिक अभियांत्रिकी विभागाने IIChE स्टुडंट चॅप्टरच्या वतीने आणि घरडा केमिकल्स लिमिटेडच्या सहकार्याने १६ सप्टेंबर रोजी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (GIT), लवेल येथे प्रतिष्ठित डॉ. के.एच. घरडा मेमोरियल राष्ट्रीय स्तरावरील क्विझ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
हा राष्ट्रीयस्तरीय कार्यक्रम रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील दूरदर्शी नेते डॉ. के.एच. घरडा यांच्या स्मृतीस समर्पित असून अभियांत्रिकी शिक्षणातील नवोपक्रम, बुध्दिमत्ता आणि उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन धीरज जाधव, एचआर (हेड), घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे यांनी केले. मुख्य अतिथी शिक्षणतज्ञ डॉ. ए.बी. मराठे होते. डॉ. ए.बी. पाटील, प्राचार्य, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि श्री गिरीश दंडीगे, प्रॅक्टिस प्राध्यापक, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, डॉ. एस.पी. टेकाडे, क्विझचे संयोजक आणि डॉ. एस.जे. कुलकर्णी, विभागप्रमुख, रासायनिक अभियांत्रिकी विभाग या सर्व मान्यवरांनी मंचावर उपस्थित राहून आपल्या विचारमंथनातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराष्ट्रभरातून उत्साही २० टीम्सने सहभागीता दर्शवली, ज्यात दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई, सिंघगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे, स्रीमती गीता डी. टटकरे पॉलिटेक्निक, गोवे, कोलाड, थडोमल शाहानी इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, रत्नागिरी, शिवाजीराव जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंबिवली, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, लवेल, के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक, शिवाजी विद्यापीठ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, कोल्हापूर यांचा समावेश होता. क्विझमध्ये MCQ, लघु उत्तरे, रॅपिड फायर आणि व्हिज्युअल प्रश्नांचा समावेश होता, जे रासायनिक अभियांत्रिकी व संबंधित क्षेत्रांचा विस्तृत आढावा घेत होते. पहिले बक्षीस २५ हजार रूपये, शिवाजीराव जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंबिवली टीमने जिंकले, दुसरे बक्षीस २० हजार रूपये घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (GIT), लवेल टीमने आणि तिसरे बक्षीस १५ हजार रूपये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, न्यू बॉम्बे टीमने जिंकली. बक्षिसे व प्रमाणपत्रे डॉ. ए.बी. पाटील, प्राचार्य, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, डॉ. एस.पी. टेकाडे, क्विझ संयोजक आणि डॉ. एस.जे. कुलकर्णी, प्रमुख, रासायनिक अभियांत्रिकी विभाग यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासायनिक विभागाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 19-09-2025












