राजापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी देशभर साजरा होत आहे. भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर असा सेवा पंधरवडा घोषीत करण्यात आला असून या सार्वजनिक सेवा, जनकल्याणाचे उपक्रम, पर्यावरण, संरक्षण, आरोग्य तसेच स्वच्छता असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याचाच भाग म्हणून भाजपा राजापूर पश्चिम मंडलात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर गुजराळी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता ही केवळ आपली वैयक्तिक सवय नसून, ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छतेतच देव वसतो’ असं आपले पूर्वज सांगत आले आहेत. जर आपलं घर, शाळा, गाव आणि देश स्वच्छ असेल, तर आपलं आरोग्य चांगलं राहील, आजारपणं कमी होतील आणि आपला समाज प्रगतीकडे वाटचाल करेल.
आपण २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाने मोठी चळवळ उभारली आहे. व खऱ्या अर्थाने या अभियानाला गती मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे, या अभिनयनांतर्गत लाखो शौचालयांची निर्मिती झाली, कचरा व्यवस्थापन सुधारले आणि स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली. आज आपल्यापैकी प्रत्येकाने स्वच्छतेचा संकल्प करणे आवश्यक आहे.
कचरा फेकताना वेगळा करणे,प्लास्टिकचा वापर कमी करणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा घाण करणं टाळणे,या छोट्या गोष्टी वाटल्या तरी त्यातून मोठा बदल घडू शकतो. आपण शाळा, महाविद्यालय, कार्यालय किंवा गावात कुठेही असलो तरी स्वतःभोवती स्वच्छता ठेवणं हीच खरी देशभक्ती आहे.’स्वच्छ भारत – स्वस्थ भारत’ हा आपला प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे.म्हणून पुन्हा एकदा आपण ठरवूया
शाळा आणि परिसर अन्य सार्वजनिक ठिकाणं, मंदिरं या ठिकाणी घाण करू देणार नाही,इतरांनाही स्वच्छतेचं महत्त्व सांगीन यातूनच खऱ्या अर्थाने सुंदर आणि निरोगी भारत घडेल.अश्या या स्वच्छता विषयक मुलांशी संवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात स्वच्छतेचा संदेश दिला आणि आपल्या लाडक्या मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत परमेश्वर चरणी निरोगी,दीर्घायू आयुष्य लाभो अशी सर्वांनी प्रार्थना केली,या दिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप केला.
या स्वच्छता अभियान प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. विचारे तसेच शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भाजपा प्रदेश सचिव महिला मोर्चा महाराष्ट्र सौ. शिल्पा मराठे, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सौ. श्रुती ताम्हनकर,सौ. रेणुका गुंडये व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच राजापूर शहरात वरचीपेठ शाळा नं. २ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विजय पारकर, सौ. शितल पटेल, सौ.शितल गोठणकर, सौ.अरूणा शेवडे, सौ. धनश्री कांबळे, सौ.नम्रता कणसे, सौ.मुमताज सारंग, सौ. संध्या पवार, सौ. प्राची पवार, सौ.श्रध्दा कातारी, सौ.प्रणाली कातारी, सुवर्णा मयेकर,विनया कोठारकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 19-09-2025












