गावखडी : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावखडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली या ग्रामसभेला महिला, ग्रामस्थ मिळून सुमारे 150 लोकांची उपस्थित लावली तसेच ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौतम पाटिल, ग्रामसेवक सानिका शिंदे, उपसरपंच मुरलीधर तोडणकर, ग्रा.प. सदस्य स्मिता भिवंदे, पोलीस पाटील सौ. साक्षी मुडे, पोलीस पाटील श्री दिनेश बिजे तलाठी श्री सचिन शेवाळे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यानी दूरदृष्टी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ग्रामसभेला मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यानी नमूद केले कि पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या 75व्या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र शासनाने “समृध्द पंचायतराज अभियान “राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभियानांतर्गत पुढील शंभर दिवस ग्रामपंचायतीनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था सक्षम करावी सभेनंतर सरपंच गौतम पाटिल यानी ग्रामस्थांना आवाहन केले कि 30 सप्टेबर पयत पहिल्या टप्यात घरपट्टी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून गावखडी राज्यात आदर्श ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरपट्टी भरण्याचे आश्वासन दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 19/Sep/2025












