Uday Samant | पक्षातील सर्वांची आरोग्य तपासणी करणार : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : सुनील नावले यांच्यासारखा सच्चा आणि सरळ व्यक्तिमत्त्व असलेला कार्यकर्ता गेल्यामुळे शिवसेना पक्षाचे आणि माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले. हे नुकसान कधी भरून निघणारे नाही. भविष्यात अशा प्रकारे कोणाची शोकसभा घ्यावी लागू नये, यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लवकरच आरोग्य तपासणी शिबिर घेऊ, अशी
भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते राजू महाडीक, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे, आबा पाटील, संतोष रावणंग आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 19/Sep/2025