Ladki Bahin Yojana, e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, कशी पूर्ण करायची ई केवायसी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..

मुंबई : Ladki Bahin Yojana : महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते.

या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ( Ladki Bahin Yojana )

दोन महिन्यात ई-केवायसी पूर्ण करावी लागणार mukhyamantri majhi ladki bahin yojana ekyc

आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी 18 सप्टेंबरपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरे यांनी या पुढं म्हटलं की ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी पूर्ण करायची? ( Ladki Bahin Yojana )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप 1: प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
स्टेप 3 : e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
स्टेप 4 : आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.

ईकेवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 19-09-2025