रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे ७७२ शेतकऱ्यांचे नुकसान

रत्नागिरी : लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर यातीन तालुक्यांच्या उपविभागात भात शेतीला मोठा फटका बसला आहे. या तालुक्यातील ७७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. सरत्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने या वर्षी भात शेतीला मोठा फटका बसला असून, पिकलेली भात शेती आडवी झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 22/Oct/2024