चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण तालुका व शहर भाजपच्यावतीने दि. २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबिर होईल.
या कार्यक्रमाला भाजपा नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत. भाजपच्या सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 20/Sep/2025












