गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील ओमकार मंगल कार्यालय चिखली येथे कामाला असणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. स्वप्नील गोपाळ कानसे (३२, कानसेवाडी चिखली) असे या घटनेतील तरुणाचे नाव आहे. तो चिखली येथील मंगल कार्यालयात अडीच वर्षांपूर्वी कामाला लागला होता.
शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास स्वप्नील याने सर्व कामगारांना चहा दिला आणि ९ वाजता तेथील एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत तो आढळून आला. त्याचा मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी नेण्यात आला. स्वप्नील हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 20/Sep/2025












