रत्नागिरी : रामआळीतील जलवाहिनी दुरूस्तीसाठी अख्खा दिवस

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरील राम मंदिराजवळ फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी पूर्ण दिवस गेला. सुदैवाने पाऊस नसल्याने हा बिघाड दुरूस्त करण्यात कोणताही व्यत्यय आला नाही.

शहरातील अंतर्गत जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. राम मंदिराजवळ छोटा लिकेज होता. परंतु त्यासाठी रस्त्याची खोदाई मोठ्या प्रमाणात करावी लागली. जेसीबीने ही खोदाई करण्यात आली. पाऊस नसल्याने खोदलेल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी साचून दुरूस्ती करण्यात कोणतेही अडथळे आले नाहीत. सोमवारी सकाळी हे काम सुरू झाले ते संध्याकाळी सहा वाजता पूर्ण झाले. दुरूस्ती करताना मोठा पाऊस पडला असता तर खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरले असते. त्यामुळे लिकेज काढण्याची दुरूस्ती करण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. कालच्या दिवसात काम पूर्ण झाले नसते तर शहराच्या खालच्या भागाला मंगळवारी पाणी पुरवठा फारच कमी दाबाने झाला असता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 22-10-2024