रत्नागिरी : रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील कुवारबाव बाजारपेठ येथील कृषी चेक नाक्यासमोर वाहन पार्क करुन इतर वाहतुकीला अडथळा निर्माण केला. या प्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास करण्यात आली. अब्दुल मुनाफ अब्दुल हमीद मजगावकर (३७, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल राकेश तटकरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी त्याने आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-०८-एपी-९८८६) हा रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील कुवारबाव बाजारपेठ येथील कृषी चेक नाक्याच्या समोर उभा केला होता. त्यामुळे इतर वाहनांना येण्या जाण्यास तसेच पादचारींना रहदारीस अडथळा निर्माण झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 20/Sep/2025














