Ratnagiri Mandavi beach : मांडवी किनाऱ्यावर मद्यप्राशन; दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील मांडवी बिच येथे मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३५ ते १.१५ वा. कालावधीत करण्यात आली. शुभम प्रकाश सावंत (२८, रा. आंबेशेत, रत्नागिरी) आणि सिध्देश पद्माकर बने (२७, रा. निरुळ रिंगीचीवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

हे दोघेही आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना मांडवी बिच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 20/Sep/2025