रत्नागिरी : शहरातील रामआळी येथील साहित्य मंदिर दुकानाच्या मागे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वा. करण्यात आली असून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जयेश प्रकाश शिवलकर (४४, रा. नाचणे, रत्नागिरी) आणि प्रविण सुरेश बाष्टे (३६, रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही संशयित साहित्य मंदिर मागील मलुष्टे यांच्या इमारतीच्या शेडच्या शेजारी मोकळ्या भागात स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्विकारुन मटका जुगार चालवत होते. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 20/Sep/2025












