गुहागर : गुहागर तालुक्यातील असगोली बौद्धवाडी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबावर वीज पडून नागरिकांचे नुकसान झाले आहे.
सध्या परतीच्या पावसाचा जोरदार दणका सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान रविवारी (दि. २०) सायंकाळी ४ वाजता गुहागरमध्ये विजांचा कडकडाट व ढगांच्या
गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला.
याचवेळी तालुक्यातील असगोली बौद्धवाडी येथे विद्युत खांबावर वीज कोसळली. यामुळे गणेश झगडे, सुनील गुरव, केतन पवार, वासुनंद पवार, सुमित झगडे आदींचे टीव्ही संच जळून खाक झाले तर प्रभाकर झगडे यांचे सेट टॉप बॉक्स, सुहास आरेकर यांचे इन्व्हर्टर, भगवान बेंदरकर यांच्या माडाच्या झाडावर वीज कोसळून माडाला आग लागली.
या नुकसानासंदर्भात वीज मंडळाचे कर्मचारी, असगोली ग्रामपंचायत कर्मचारी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली तर तलाठी एस. अगाऊ यांनी पोलिस पाटील उदय असगोलकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीविषयी माहिती घेऊन लवकरच पंचनामा करण्यात येईल, असे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 22/Oct/2024










