लांजा : डंपरचे पुढील – जॉईंट तुटल्याने डंपर उलटून अपघात झाला. लांजा-आसगे-तळवडे मार्गावर आडवली रेल्वेब्रिज येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू पसरल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर वाळू घेऊन लांजा-आसगे-तळवडेमार्गे जात असताना आडवली रेल्वेब्रिज येथे हा डंपर आला. त्यावेळी डंपरचे पुढील जॉईंट तुटल्याने डंपर उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू पसरली होती. रस्त्यावर वाळू पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघातात चालकदेखील जखमी झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 20/Sep/2025












