Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan : समृद्ध पंचायतराज’साठी कुरतडेत ग्रामस्तरीय समितीची निवड

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावाची विशेष ग्रामसभा कुरतडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच प्रतीक्षा पालवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसरपंच सूरज जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुभाष भोवड, अनिल भाटकर, तंटामुक्त अध्यक्ष मोहन फुटक, संपर्क प्रमुख डॉ. कलगे व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या संभाजीनगर येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रारंभाचे थेट प्रक्षेपण सर्व ग्रामस्थांना दाखविण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभियान संदर्भात कोणकोणते उपक्रम राबवावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले व त्यानुसार विशेष ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समितीची निवड करण्यात आली.

सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे आदींसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली. तसेच महसूल विभागांतर्गत पाणंद रस्ते व नमुना नं. २३ ला नमूद असलेल्या पायवाटा रस्ते महसूल अभिलेखात नोंद करण्याबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती सभेत देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 20/Sep/2025