खेड : खेड शहरातील समर्थनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा पाइपलाइनची गळती सुरू आहे. चारपेक्षा अधिक ठिकाणी पाईप तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही नगरपालिकेकडून दुरुस्तीची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून शहरासाठी कोट्यवधी रुपयांची नळपाणी योजना मंजूर झाली. त्या अंतर्गत पावसाळ्यापूर्वी समर्थनगरातील अंतर्गत रस्त्यांवर खोदकाम करून नवीन पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्ड्यांचा त्रास सुरू असतानाच पाइपलाइन गळतीची भर पडल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. गळतीतून वाहणारे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांत साचून राहते. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. पिण्याचे पाणी अशारीतीने वाहून जात असतानाही पालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 20/Sep/2025












